महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोबाईल खर्च होणार बंद - शासकीय सिमकार्डचा खर्च बंद ठाणे बातमी

मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने २००९ साली कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ३०० पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केले होते. मात्र, यामुळे प्रत्येक महिन्याला प्रशासनाला एकूण बिलाचा खर्च ४५ ते ६५ हजार इतका होत आहे. सिमकार्डवर होणारा खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिका अधिकारी,कर्मचारी यांचा मोबाईल खर्च बंद
पालिका अधिकारी,कर्मचारी यांचा मोबाईल खर्च बंद

By

Published : Oct 19, 2020, 6:39 PM IST

ठाणे -येथील मीरा भाईंदर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी वापरत असलेल्या शासकीय सिमकार्डचा खर्च यापुढे प्रशासनाकडून करण्यात येणार नाही. याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले असून अधिकारी कर्मचारी यांनी सिमकार्ड स्वतःच्या नावे करावेत असेही सांगण्यात आले आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने २००९ साली कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी एअरटेल कंपनीकडून ३०० पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केले होते. एअरटेल कंपनीकडून याचे प्रति मिनिटे दहा पैसे बिल आकारण्यात येत होते. काही कालावधीनंतर स्थायी समितीच्या निर्णयनुसार वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम देखील खरेदी करण्यात आले. दरमहा एक सिमकार्ड मागे एअरटेल कंपनी १६० हुन अधिक बिल पाठवत आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला प्रशासनाला एकूण बिलाचा खर्च ४५ ते ६५ हजार इतका होत आहे. सिमकार्डवर होणारा खर्च टाळण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी महासभेत कर्मचारी व अधिकारी वापरत असलेल्या सिम कार्डचा खर्च प्रशासनाने करू नये, असा ठराव मंजूर करण्यात आला होता.

तर आता मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी कर्मचारी व अधिकारी यांनी वापरात असलेले सिमकार्ड स्वतःच्या नावे करण्यासाठी कागदपत्रे सामान्य प्रशासन विभागाला सादर करावे, असे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे महानगरपालिका बिलाचा खर्च देणार नाही असे स्पष्ट आदेश उपायुक्त अजित मुठे यांनी दिले आहे.

हेही वाचा -कळवा-ऐरोली 'एलिव्हेटेड रेल्वे मार्ग' लवकरच... खासदार राजन विचारेंची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details