ठाणे - रात्री चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमध्ये मॅसेज पाहताना मोबाईलचा स्फोट होऊन एक २६ वर्षीय तरुण जखमी झाला. ही घटना ठाण्यातील अंबरनाथ येथे घडली आहे. अमित भंडारी असे जखमी युवकाचे नाव आहे.
अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण जखमी - amit bhandri
अंबरनाथ येथील कोहोजगाव भागात राहणाऱ्या अमित याच्याकडे असलेल्या आयफोन कंपनीच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला.
अंबरनाथ येथील कोहोजगाव भागात राहणाऱ्या अमित याच्याकडे असलेल्या आयफोन कंपनीच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला. या स्फोटात अमितच्या एका पायाला गंभीर जखम झाली असून दुसरा पायदेखील भाजला आहे. अमित याने मागील वर्षी आयफोन कंपनीचा आय ६ हा मोबाईल अंबरनाथच्या एका दुकानातून विकत घेतला होता.
रविवारी एका कार्यक्रमातून घरी आल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावला होता. रात्री उशिरा मोबाईलमध्ये काही मेसेज आला आहे का? हे तपासण्या करिता त्याने मोबाईलजवळ घेतला तर त्या अचानक मोबाईलचा अचानक स्फोट झाला. लगेच मोबाईल फेकून दिला आणि आग विझवण्यात आली. स्फोटाच्या तीव्रतेने कापसाच्या गादीला आग लागली. या घटनेमध्ये दोन्ही पायांना जखम झाली आहे. जवळपास २६ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ऍपल कंपनीकडे तक्रार करणार असल्याचे अमित भंडारी याने सांगितले.