ठाणे -अनेकदा तक्रारी करूनही वाढीव बिले कमी न केल्याने आज (सोमवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्यनगरमधील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. वाढीव वीज बिल विरोधात लोकमान्यनगर येथील महावितरण कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मनसेने वाढीव वीज बिलाविरोधात महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे - ठाणे मनसे आंदोलन
अनेकदा तक्रारी करूनही वाढीव बिले कमी न केल्याने आज (सोमवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्यनगरमधील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. वाढीव वीज बिल विरोधात लोकमान्यनगर येथील महावितरण कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिक आता बाहेर पडू लागले आहेत. महावितरणच्या ठाण्यातील सर्वच कार्यालयाबाहेर नागरिकांच्या तक्रारीसाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. चार महिने मीटर रिडींग न घेता महावितरणने अंदाजे बिले पाठवली आहेत. आता ही बिले भरूनही नागरिकांना पुन्हा वाढीव बिले आहेत. यावर अनेकदा लेखी तक्रारी करूनही महावितरण यावर कोणतीही उपाययोजना करत नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना वाढीव वीजबिल देण्यात आली आहेत. ज्यामध्ये वहन आकार आणि प्रत्येक युनिटमागे आकार वाढवण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे.