ठाणे -लॉकडाऊनच्या काळातविजेचा वापर झालेला नसताना देखील वीज महामंडळाकडून सरासरी बिले पाठवली जात आहे. ही बिले तात्काळ थांबवा अन्यथा मनसेच्या खळ्ळ खट्याकचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशारा मनसेचे उपशहराध्यक्ष विश्वजित जाधव यांनी वीज महामंडळाला दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये व कंपन्या पूर्णतः बंद आहेत. यामुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात वीज महामंडळाकडून ग्राहकांना वीजबिले पाठवण्यात येत आहेत. ही बिले विजेचा वापर नसताना देखील सरासरी पद्धतीने पाठवण्यात येत आहेत. त्यांच्या या निर्णयावर मनसेने आपेक्ष घेतला आहे.