नवी मुंबई- पनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. मनसेतर्फे बांगलादेशींना खळखट्याकचा इशारा देण्यात आला आहे. 'बांगलादेशींनो चालते व्हा', अशा आशयाचे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. आश्रय दिलेल्या स्थानिकांनी बांगलादेशींना हाकलले नाही, तर खळखट्याक शिवाय पर्याय नसल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात 9 फेब्रुवारीलामनसेचा आझाद मैदान येथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात मनसेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे. पनवेल परिसरात विशेषतः पनवेलमधील गावे व झोपडपट्टीमध्ये बनावट कागदपत्रे बनवून बांगलादेशी राहत आहेत हे वारंवार समोर आले आहे.
हेही वाचा - 'समूह विकास योजनेला फडणवीसांची मंजुरी; मात्र, भूमिपूजनाचे आमंत्रण द्यायला सेना विसरली'
पनवेलमधील चिखले या गावात ईनामुल मुल्ला नावाच्या बांगलादेशी व्यक्तीने सर्वांचीच फसवणूक केली. खोटी कागदपत्रे तयार करून मराठी नावाने चक्क एका मराठी कुटुंबाचा जावई झाला होता. मनसे हे कदापी सहन करणार नसल्याचे मनसे पदाधिकारी महेश जाधव यांनी सांगितले. तसेच पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने पडताळणी करावी आणि या बांगलादेशींची हकालपट्टी करावी नाहीतर आम्हाला खळखट्याक शिवाय पर्याय नसल्याचेही जाधव म्हणाले. नवी मुंबई, पनवेल परिसरात स्वस्तात मजूर मिळतात. म्हणून अनेक ठेकेदार या बांगलादेशींची राहण्याची सोय करतात. त्यांना आश्रय देत आहेत हे आमच्या लक्षात आल आहे. आमचा त्या ठेकेदारांना आणि बांगलादेशींना आश्रय देतोय त्या सगळ्यांना ईशारा आहे, तात्काळ हे थांबवा नाहीतर, आम्ही आमच्या स्टाइलने धडा शिकवू, असा इशारा मनसे पदाधिकारी सुधीर नवले यांनी दिला आहे.
हेही वाचा - 'बांगलादेशी घुसखोरांनो तुमच्या देशात निघून जा', मनसे इशारा