ठाणे- गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवारी (10 ऑगस्ट) रात्री चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मोफत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनसे नेते अभिजित पानसे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व इतर मनसैनिक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी कोकणात जाण्यासाठी मोफत बससेवा देणार असल्याचे मनसेने जाहीर केले होते. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली. कोकणात जाण्यासाठी 25 बसेस पालिका मुख्यालयापासून सोडण्यात आल्या.
मनसेने कोकणात सोडल्या 25 मोफत बसेस, चाकरमान्यांना दिलासा - ठाणे मनसे बातमी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोफत बस सेवा मनसेकडून सुरू करण्यात आली आहे. सोमवारी पालिका मुख्यालयाजवळून 25 बसेस मनसेमार्फत सोडण्यात आल्या आहेत.
एकीकडे परप्रांतीय लोकांना घरी सोडण्यासाठी रेल्वे, बसची सुविधा राज्य सरकारने केली. पण, सरकारकडे कोकणातील चाकरमान्यांची व्यवस्था करायला पैसे नाहीत. रेल्वे सुरू करायला सरकारने प्रयत्न केले नाहीत, नेमके सरकार आहे कुणाचे ? खोटे गुन्हे दाखल केले तरी मनसे दिलेला शब्द पाळणार, असे मनसेचे जिल्हाअध्यक्ष जाधव म्हणाले. ज्या ठिकाणाहून मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक केली होती त्या ठिकाणाहून या बसेस सोडण्यात आल्या.
गणपती बाप्पाचा आशीर्वाद कोणाला मिळेल हे नजीकच्या काळात कळेल, असे व्यक्तव्य यावेळी मनसे नेते अभिजित पानसे यांनी केले. चाकरमान्यांसाठी टप्प्या-टप्प्याने या बसेस सोडण्यात येणार आहेत रस्त्यात कोणतेही अडचण येऊ नये, यासाठी मार्गावरील सर्व स्थानिक कार्यकर्त्याना त्याबाबत सांगण्यात आले आहे, त्यांच्याकडून जेवण नाष्ठा दिला जाणार आहे त्यामुळे कोनतीही अडचण येणार नाही, अशी माहिती मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिली.