महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MNS Mla Raju Patil : 90 टक्क्यांच्यावर आमदार कोट्यधीश; मग मोफत घरे कशासाठी, राजू पाटलांचा सवाल - raju patil on mla home

ठाकरे सरकारने राज्यातील 300 आमदारांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मनसेचे आमदार राजू पाटील ( MNS Mla Raju Patil ) यांनी विरोध केला आहे. ९० टक्क्यांच्यावर आमदार कोट्यधीश मग मोफत घरे कशासाठी, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Raju Patil
Raju Patil

By

Published : Mar 25, 2022, 10:50 PM IST

ठाणे -राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी केली. मात्र, या घोषणेनंतर सोशल मीडियावर ठाकरे सरकारवर एकच टीकेची झोड उठवली जात आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील या निर्णयाला विरोध करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील ९० टक्क्यांच्यावर आमदार कोट्याधीश असताना मोफत घरे कशासाठी?, असा सवाल पाटील ( MNS Mla Raju Patil ) यांनी उपस्थित केला आहे.

राजू पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

राजू पाटील म्हणाले की, राज्यातील ९० टक्क्यांच्यावर आमदार कोट्याधीश आहेत. मग आमदांराना मोफत घरे कशासाठी. घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा, असेही पाटील यांनी म्हटलं आहे.

राजू पाटील ट्विट

आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात, आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट

गृह निर्माण मंत्री आव्हाड यांनी केलेल्या ट्विटला मनसे आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, 'देर आये दुरुस्त आये' खरं तर ज्याला घ्यायचं तो घेईल ना. तीन तीन लाख रुपये आम्हाला पगारे दिली जात आहेत. त्यांना मोफत घर द्या असे मी म्हणेन जे खरच गरजू आमदार आहेत. ज्यांना परिस्थितीच नाहीये अशांना मोफत द्या हरकत नाही. परंतु, तसे केवळ दोन-तीन आमदार असतील. ३०० आमदारांना अशी खैराती सारखी घरे वाटणं मला तर ते योग्य नाही वाटत, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा -Devendra Fadnavis Reply CM : पोलीस राज्य सरकारचे घरगडी आहेत का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details