महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवली शहराच्या वाटोळ्याला भाजपही जबाबदार - मनसे आमदार राजू पाटील

पाटील यांनी 27 गावातील मालमताना चुकीच्या दराने केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांपैकी 18 गावे वगळली गेली असली तरी अद्याप पालिकेत असलेल्या 9 गावांना महापालिका प्रशासनाने योग्य दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी 2015 च्या बाजार भावानुसार कर आकारणी केली आहे.

मनसे आमदार राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील

By

Published : Oct 13, 2020, 8:31 PM IST

ठाणे -शिवसेना, भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. या महापालिकेत 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे दोन्ही शहरांचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. 'केडीएमसी'त भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली.

माहिती देताना मनसे आमदार राजू पाटील

डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या ९ गावांमध्ये सुधारित मालमत्ता कर आकारण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली. पाटील यांनी 27 गावातील मालमताना चुकीच्या दराने केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांपैकी 18 गावे वगळली गेली असली तरी अद्याप पालिकेत असलेल्या 9 गावांना महापालिका प्रशासनाने योग्य दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी 2015 च्या बाजार भावानुसार कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिकांना 3 पट, 5 पट आणि काही जणांना 8 पट कर वाढ लादली गेली असून ही आकारणी चुकीची असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आमदार पाटील यांनी आणून दिले.

हेही वाचा -मुख्यमंत्री-राज्यपाल वादात हिंदुत्ववादी नेत्याची उडी; म्हणाले, भाजपालाच हिंदुत्व समजण्याची गरज

तसेच हा प्रश्न सोडविल्यास पालिकेचा रखडलेला मालमत्ता कर वसूल होऊ शकेल असे ते म्हणाले. तसेच आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांना पत्र सुद्धा दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असल्याने हा मालमत्ता कर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी समाजिक कार्यकरते राजू नलावडे, वर्षा महाडिक,नगरसेवक प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष राजेश कदम,हर्षद पाटील,मनोज घरत, नंदू ठोसर, संजय चव्हाण आणि डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. तर विविध विकास कामे होत नाहीत, यासाठी काल भाजप नगरसेवक आणि भाजप आमदार चव्हाण यांनी महापालिकेत आंदोलन केलं होतं.

कल्याणचा पत्रीपूल जगातील आठवे आश्चर्य ठरणार वाटतं; मनसेचा शिवसेनेला टोला..

या दरम्यान त्यांनी कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरू आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. कारण, या पुलावर आज त्यांना महापालिकेत येताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले.

ABOUT THE AUTHOR

...view details