ठाणे -सोमवारी हत्या झालेल्या जमील शेखवर आज (बुधवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राबोडीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. सोमवारी दुपारी भर रस्त्यात गोळी डोक्यात घालून करण्यात आलेल्या जमील शेख हत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. अद्याप आरोपी परागंदा आहे. तसेच हत्येचे कारणही अस्पष्ट आहे.
मनसे पदाधिकारी मृत जमील शेख याची हत्या होऊन दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला. ठाणे पोलिसांना हत्या करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. मात्र, आरोपी अद्याप पोलिसांच्या कक्षेबाहेर आहेत. बुधवारी दुपारी जमील शेख याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत तब्बल १० हजाराच्या आसपास राबोडीवासी सहभाग झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणातील गर्दीमुळे वाहतुक ठप्प झाली होती. दरम्यान, आरोपी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे भूमिका जमीलच्या कुटुंबीयांनी घेतली होती. मात्र, कुटुंबियांशी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि मनसे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.
फिजिकल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी -
मृत जमील शेख याच्या अंत्यसंस्कारासाठी राबोडी परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहतुकीचा चक्काही जाम झाला. तर तुफान गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले. दहा हजाराच्या आसपास नागरिक रस्त्यावर होते.
हेही वाचा -माहूर पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी फरार! बलात्कार प्रकरणात झाली होती अटक