महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे - सरदेसाई - मनसे नेते नितीन सरदेसाई

9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मनसेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले.

मनसे बैठक
मनसे बैठक

By

Published : Feb 1, 2020, 8:25 AM IST

ठाणे- मनसेचा आझाद मैदानावर 9 फेब्रुवारीला पाकिस्तान, बांगलादेशमधील भारतात येणाऱ्या घुसखोरांविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्यासाठी पूर्वनियोजनसाठी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक शुक्रवार (दि. 31 जानेवारी) ठाण्यात घेण्यात आली. मनसेच्या या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले.

मनसेच्या आंदोलनात अनेकांनी सहभागी व्हावे


ठाणेकर मोठ्या संख्यने एकत्रित या आंदोलनात सहभागी होतील यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे ठाणे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - ट्रकने कट मारल्याने दुचाकीला अपघात.. पत्नी ठार, पती व मुलगा गंभीर

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी एकत्र यावे. तसेच ज्यांना राज ठाकरे यांचे विचार पटतात त्यांनीही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. त्यावेळी मनसेच्या नव्या झेंड्यासोबत तिरंगा झेंडा हातात घेऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले. भायखळा ते आझाद मैदान मोर्चा काढण्यासाठी पोलिसांना परवानगी मागत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - दरोडेखोरांनी भर दिवसा घरातून लुटला १ कोटी ८६ लाखांचा ऐवज

ABOUT THE AUTHOR

...view details