ठाणे - सामान्य महिला तसेच सिने क्षेत्रातील महिला आपण नेहमीच पाहतो परंतु ज्या महिला मनोरूग्ण तसेच विकलांग आहेत, अशा महिलांसोबत महिला दिन साजरा करायची संकल्पना मनसेचे शहर अध्यक्ष तसेच स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या मनात आली. अखेर या कल्पनेला त्यांनी मूर्त रुप दिले.
महिला दिनानिमित्त मनसेचा सामाजिक उपक्रम, मनोरुग्ण आश्रमास भेट - Mns
ज्या महिला मनोरूग्ण तसेच विकलांग आहेत, अशा महिलांसोबत महिला दिन साजरा करायची संकल्पना मनसेचे शहर अध्यक्ष तसेच स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या मनात आली. अखेर या कल्पनेला त्यांनी मूर्त रुप दिले.
मनसेचे नेते नितीन नांदगावकर तसेच मनसे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेदभाई शेख यांच्या सहकार्याने ऐरोली येथील मिशनरीस ऑफ चॅरिटी प्रेमदान या आश्रमास भेट देण्यात आली. तेथील एकूण १४० मनोरूग्ण महिलांना फळ तसेच औषधींचे वाटप करण्यात आले. या मनोरूग्ण महिलांसोबत संवाद साधत असताना, असे निदर्शनास आले, की या ठिकाणी बऱ्यचा महिला या कुटुंब त्रस्त आहेत. त्यांना कुटुंबातील महिलांनीच त्रास देऊन त्यांचा छळ केला. त्यांना या ठिकाणी पाठवले.
यावेळी प्रत्येक पीडित महिलेला त्यांचा हक्क मिळवूण देणार, असे आश्वासन यावेळेस मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी दिले आहे.