ठाणे:ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हरहर महादेव सिनेमाच्या वेळी झालेल्या प्रकाराबाबत एका नेत्याने विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त केल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. यावर प्रतिउत्तर देत अविनाश जाधव यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.
...अविनाश जाधव आमदार झाला असता: आम्हाला आणि आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना महिलांना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा शिकवण नाही. आणि असे प्रकार आम्ही करणार देखील नाही, असे सांगत अविनाश जाधव यांनी जर खोटेपणा आला असता. तर आज अविनाश जाधव आमदार झाला असता, असा टोला जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे. वारंवार ट्विटरच्या माध्यमातून टीका टिप्पणी करून जितेंद्र आव्हाड खोटा आरोप करत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.