ठाणे - कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत जिथं लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. तिथे या परिस्थितीत सुद्धा प्रशासनातील फायलेरिया विभागातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण शहरातील सर्व परिसरात जाऊन जंतूनाशक फवारणी करत आहेत.
कोरोनाच्या संकटात माणुसकीचा हात, फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवणासह मास्क वाटप - thane corona news
कोरोनाच्या संकटकाळातही अनेक कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आरोग्या व्यवस्थेतील सर्व कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी झटत आहेत.

mns distributed mask sanitizer among health workers
या विभागातील कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे आणि प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना कोरोना सेफ्टी किट (मास्क,सॅनिटायझेर,ग्लोव्हस) याचबरोबर जेवणाची व्यवस्था करण्यात आली.