महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक - नवी मुंबई मनसे आंदोलन

महावितरण कंपनी कडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत मनसेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित विज बिले पाठवून त्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी तसेच ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.

mns-agitation-over-electricity-bills-in-nerul-navi-mumbai
नवी मुंबईत वाढीव विज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

By

Published : Jul 31, 2020, 1:31 PM IST

नवी मुंबई- परिसरात अव्वाच्या सव्वा वाढीव विजबीले येत असल्याने तसेच बिल भरूनही वाढीव बील आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळे मनसे आक्रमक झाली असून, वाढीव बिलाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

वीज बिलांविरोधात नवी मुंबईत मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या नेरुळ येथील कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना महावितरणच्या प्रवेद्वारावर रोखले. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वावर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलावण्यात आले. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत मनसेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित विजबिले पाठवून त्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी तसेच ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये, अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली. अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाची वीज कापण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी दिला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडी करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.

नवी मुंबईत वाढीव विज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

ABOUT THE AUTHOR

...view details