मीरा भाईंदर(ठाणे) - संपूर्ण मुंबईसह उपनगरात लोकल सुरू करण्यासाठी मनसेकडून भाईंदर रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाईंदर पूर्व पश्चिम स्थानकावर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य सरकारविरोधात मनसैनिकांनी घोषणाबाजी केली. लोकल सेवा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसैनिकांनी दिला.
चाकरमान्यांसाठी लोकल सेवा सुरू करा; मनसे आक्रमक - लोकल रेल्वे बातमी
सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू व्हावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. २२ मार्चपासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यानंतर राज्य सरकारने एसटी सेवा सुरू केली आहे.
सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू व्हावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. २२ मार्चपासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यानंतर राज्य सरकारने एसटी सेवा सुरू केली आहे. परंतु, सामान्यांसाठी लोकल सेवा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट बस, एस टी सेवांवर जास्त भार पडत आहे. त्यामुळे गर्दी जास्त होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
आज मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकावर मनसेकडून रेल्वे प्रवास करून अनोखे आंदोलन करण्यात आले. तसेच भाईंदर स्थानकावर देखील मनसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, परिस्थितीनुसार चाकरमान्यांचे हाल होत आहेत. लांबचा प्रवास करताना ३ ते ५ तासांचा बसमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच लोकल सेवा सुरू झाल्यास थोडा दिलासा मिळेल. राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. लोकल सेवा लवकर सुरू करण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप राणे यांनी व्यक्त केली.