ठाणे- पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आंदोलन केले. एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले असताना, अशावेळी केंद्र सरकारकडून मागील 17 दिवसांपासून पेट्रोल डिझेलची दर वाढ करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मनसेचे ठाण्यात आंदोलन... - MNS agitation thane
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी असताना देखील केंद्र सरकार पैसा कमावण्याच्या उद्देशाने दरवाढ करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले.
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात मनसेचे ठाण्यात आंदोलन...
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी असताना देखील केंद्र सरकार पैसा कमावण्याच्या उद्देशाने दरवाढ करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहर अध्यक्ष विश्वजित जाधव, ठाणे शहर विधानसभा सचिव संजय भुजबळ, महेश कदम शाखा अध्यक्ष पीटर डिसोझा उपस्थित होते.