ठाणे - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची वसुलीचे आदेश पोलीस दलाला दिल्याचा आरोप केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. त्या विरोधात महाविकास आघाडी सरकारबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी धामणकर नाका येथे भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी म्हणजे वसुलीचे सरकार -
भिवंडीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनसेचे भीक मांगो आंदोलन - भिवंडीत मनसेचे भीक मांगो आंदोलन
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे, यावर परमबीर सिंग यांच्या पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मनसेकडून भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे, यावर परमबीर सिंग यांच्या पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व या अभिनव भीक मांगो आंदोलनातून जमा होणारी रक्कम गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविली जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष मनोज गुळवे यांनी दिली आहे. या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी भिवंडी लोकसभा क्षेत्र अध्यक्ष शैलेश बिडवी, पदाधिकारी प्रवीण देवकर, प्रवीण धावडे, रोहिदास पाटील यांच्यासह असंख्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.