नवी मुंबई :राज्यातील धार्मिक वातारण अजूनही अशांत आहे. पनवेल रेल्वे स्टेशनमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पनवेल रेल्वे स्थानकामध्ये चक्क प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या ठिकाणी काही मुस्लिम व्यक्ती नमाज पढत आहेत. नमाज पढण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकारामुळे आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच येथे त्या प्रकरणावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मनसे त्या कृतीविरोधात पनवेल रेल्वे स्टेशनवर महाआरती करणार आहे.
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये महाआरती : स्टेशनमध्ये अशी कृती होत असल्याने कुठेतरी धार्मिक वातावरण गढूळ होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. मनसेचे प्रवक्ते पनवेल महानगराचे शहरअध्यक्ष योगेश चिले यांनी ७ जुलैला दुपारी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यात म्हटले या देशात सर्वधर्मसमभाव आहे, हे सिद्ध करण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये यावे. रेल्वे स्थानकावर जर नमाज चालतो, तर महाआरतीसुद्धा नक्की चालणार. त्यामुळे सर्व हिंदू बांधवानी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये महाआरतीसाठी उपस्थित राहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.