ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीविरोधात उल्हासनगरमधील मनसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. लाल चौकी परिसरात मनसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवत विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह दहा ते बारा मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक - उल्हासनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीविरोधात उल्हासनगरमधील मनसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. लाल चौकी परिसरात मनसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवत विठ्ठलवाडी पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक
उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे त्यांना निशाणा केले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मागे चौकशी सत्र सुरू केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून मुंबईतील ईडीच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Last Updated : Aug 22, 2019, 7:43 PM IST