नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे 4 वाजता नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी, माथाडी कामगार यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. मलाही ईडीची नोटीस येऊ शकते असा टोला यावेळी बोलताना रोहित पवार यांनी लगावला.
आमदार रोहित पवारांनी दिली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट शेतकरी व्यापाऱ्यांशी सवांद -
रोहित पवार अचानकपणे पहाटे एपीएमसी मार्केट मध्ये आले व त्यांनी ठिकठिकाणी थांबून, बाजारपेठेत आलेल्या शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगार यांच्याशी सवांद साधला.
शेतकऱ्यांच्या अडचणी अधिवेशनात मांडण्याचे दिले आश्वासन -
राज्य सरकार नेहमीचं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल असे वक्तव्य त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या समस्या येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक शेतकरी आम्हाला फोन करून समस्या मांडत असतात. बरेच महिने झाले व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाहीत, दर कमी देत आहेत अशा त्यांच्या तक्रारी असतात. या समस्याच्या विषयी एपीएमसी प्रमुखांशी बोलून, समस्या सुटतात का? यासाठी नक्कीचं प्रयत्न करेन असे ते म्हणाले.
भाजप इडी चा वापर करून, विरोधकांना लक्ष करत आहे -
भाजप इडी चा वापर करून, वरोधकांना लक्ष करत आहे. मलाही कदाचित इडीची नोटिस येऊ शकते असाही टोला रोहित पवार यांनी लगावला. भाजपची विचारधारा रोखण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी असेही त्यांनी म्हंटले आहे.