मीरा भाईंदर (ठाणे) -सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. 19 ऑक्टोबरला मंत्रालयात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी दिले. मात्र, पुरेशी यंत्र सामग्री नसल्यामुळे हा निर्णय केवळ कागदवरच राहणार असल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ते या संदर्भात महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन बोलत होते.
मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नाचा निर्णय केवळ कागदावरच राहण्याची शक्यता - मीरा भाईंदर बातमी
महाविकास आघाडी सरकाकडून मीरा भाईंदर शहराला 135 द. ल. ली. व नवी मुंबई महापालिकेकडून 20 द. ल. ली. पाणीपुरवठा तातडीने कारवाई करण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून देण्यात आले.
मीरा भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. यात स्टेम प्राधिकरणकडून 86 द. ल. ली. पाणीपुरवठा केला जातो आणि एमआयडीसीकडून 135 द. ल. ली. आरक्षित पाण्यापैकी सरासरी 105 द. ल. ली.चा पाणी पुरवठा होतो. पण, यातदेखील गेल्या काही दिवसांपासून 25 द. ल. ली. पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी मंत्रालयात सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एमआयडीसीकडून 135 द. ल. ली. पाणी आणि नवी मुबंईकडून 20 द. ल. ली. असे एकूण 155 द. ल. ली. पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, प्रत्यक्षात मीरा भाईंदर शहरात इतके पाणी उचलण्याची यंत्र सामुग्री नसल्यामुळे हा निर्णय केवळ कागदावर मर्यादित राहणार आल्याचे आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. तर अधिक माहितीसाठी पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधण्याचा तसेच फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा -घरावर वीज कोसळून 26 जण जखमी; ठाण्याच्या शहापूरमधील घटना