मीरा भाईंदर(ठाणे) - 'एका खासगी कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे शब्द प्रयोग केल्यामुळे लाखो शिवभक्तमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा लोकांमुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमीच्या भावनांचा स्फोट होऊ शकतो. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा कॉमेडियनवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी अनेक संघटना तसेच शिवभक्त कडून करण्यात येत आहे. याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली.
कॉमेडियन अग्रीमा जोशुआला अटक करा, आमदार प्रताप सरनाईकांची मागणी - कॉमेडीयन अग्रीमा जोशुआ न्यूज
कलाकारांचा आणि त्यांच्या विनोद बुद्धीचा आदर करतो. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद करून कोणी स्वतःचा दुकान चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
महाराष्ट्राचे आराद्य दैवत असल्यामुळे अशा विकृत बुद्धीच्या या कॉमेडियनचा शो बंद करून ताबडतोब अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मी देखील कॉमेडी विथ कपिल, चला हवा येऊ द्या, असे अनेक हास्य विनोद करणारे शो पाहतो. कलाकारांचा आणि त्यांच्या विनोद बुद्धीचा आदर करतो. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद करून कोणी स्वतःचा दुकान चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
जे लोक कलेच्या नावाखाली महाराजांचा अवमान करत असतील, असे कलाकार आम्हाला मान्य नाहीत. उलट हे कलाकार नसून समाजकंठक आहेत. शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. अग्रीमा जोशुआला सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सरनाईक यांनी दिली.