ठाणे :ठाण्यात सत्ताधाऱ्यांनी घातलेला धुमाकूळ यावर ठाणेकर जरी मौन धारण करून बसले असले तरीही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीला संपवण्याचा सुरु झालेल्या कंटाळा शह देत २५ जानेवारीला राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाण्यात गाडीतून फिरले, एकाच मंचावर आले. आणि जैन मंदिरात उद्धव ठाकरेंना घेऊनही गेले. त्यामुळे हा पराक्रम शिंदे गटाच्या अस्तित्वाला सुरुंग लावणारा ठरत आहे.
जगदाळे यांनी माहिती दिली : मुंब्र्यातून जवळपास 6 जण शिंदें गटाच्या गळाला लागले. संख्याबळ वाढावे म्हणूनच बंपर ऑफर देण्यात आली. 1 कोटी रोकड आणि तिकीट तर दुसरी ऑफर 1 कोटी रोकड 10 कोटीचे कंत्राट अशी ऑफर देण्यात आली. सहा नगरसेवक निश्चित फुटणार याची कल्पना आव्हाडांना आहे. दरम्यान, दुसरीकडे ठाण्यातही अशीच बंपर ऑफर दिल्याने व्यवसायाने बिल्डर असलेल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक यांनाही आमदारकीची विधान परिषदेत संधीची ऑफर दिल्याने हनुमंत जगदाळे यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यामुळे आता हनुमान जगदाळे आमदारकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात जाणार असून, जाताना आमदारकी सोबतच क्लस्टर डेव्हलपमेंटचा लाभही घेण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती खुद्द जगदाळे यांनी दिली आहे.