महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील 'त्या' शाळेला आमदार केळकरांनी ३५ संगणक दिले भेट - mla sanjay kelkar

मंगळवारी सकाळी मावळी मंडळाच्या शाळेत शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या आगीत शाळातील संगणक रूम जळून खाक झाली होती. या आगीत जवळपास ३५ संगणक जळून खाक झाले होते .

ठाण्यातील 'त्या' शाळेला आमदार केळकरांनी ३५ संगणक दिले भेट

By

Published : Jun 1, 2019, 1:17 PM IST

ठाणे- चरई परिसरात असलेल्या मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला मंगळवारी अचानक लागलेल्या आगीत शाळेतील सर्व संगणक जळून खाक झाले होते. दरम्यान, भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी मावळी मंडळाच्या शाळेला भेट देऊन तातडीने आमदार निधीतून तब्बल ३५ संगणक तातडीने उपलब्ध करून दिले.

ठाण्यातील 'त्या' शाळेला आमदार केळकरांनी ३५ संगणक दिले भेट

मंगळवारी सकाळी मावळी मंडळाच्या शाळेत शॉर्टसर्किटने अचानक लागलेल्या आगीत शाळातील संगणक रूम जळून खाक झाली होती. या आगीत जवळपास ३५ संगणक जळून खाक झाले होते . एकही संगणक शिल्लक राहिला नव्हता . याची गंभीर दखल घेत भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी सकाळी मावळी मंडळाच्या शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेच्या संगणक रूमची पाहणी केली. त्यानंतर त्वरित आमदार निधीतून ३५ संगणक उपलब्ध करून दिले.

आगीत दुर्दैवाने सगळेच संगणक जळाले आहेत. हे संगणक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महत्वाचे आहेत. आता १३ जूनला पुन्हा शाळा सुरु होईल. तेव्हा विद्यार्थ्यांना मात्र संगणक आवश्यक आहे. तत्पूर्वी प्रशासकीय काम आता सुरू होईल त्यामुळे आमदार निधीतून त्वरित ३५ संगणक देण्याची तयारी दर्शवून त्यांनी मावळी मंडळ शाळेला ३५ संगणकाचे वाटप केले.

ABOUT THE AUTHOR

...view details