महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Support Ajit Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी 'या' आमदाराचा पाठिंबा - Ajit Pawar Become CM

शहरासह जिल्ह्यातील विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी जे तिकडे आहे ते लवकरच आमच्याकडे येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

प्रमोद हिंदुराव यांची प्रतिक्रिया
प्रमोद हिंदुराव यांची प्रतिक्रिया

By

Published : Jul 16, 2023, 10:26 PM IST

प्रमोद हिंदुराव यांची प्रतिक्रिया

ठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस दहशतीपासून मुक्त झाला आहे. जे उरले सुरले आहेत तेही आमचे आहेत. ते सगळे येतील, उशीर झाला तरी चालेल. पण त्यांना शहाणपण आल्याशिवाय राहणार नाही, असे विधान अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केले आहे. जिल्ह्यातील दोन आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनीही तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी शहरे वगळता जिल्ह्यात सर्वत्र अजित पवार यांच्या गटाचे वर्चस्व असल्याचे समोर आले आहे.

आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आज शहर, जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला होता. त्यांचा त्रास तुम्हाला होतो का? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर हिंदुराव म्हणाले की, कोणी कोणाला सोडले यापेक्षा आपल्यामुळे कोण जोडले गेले असे आमचे प्रयत्न सुरु आहे. कोणाच्याही खांद्यावर भार टाकण्यापेक्षा आम्ही आमचे सक्षम आहोत. आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. सोबत येणाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असे मत अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केले.

शरद पवार आमचे आदर्श - आमदार दरोडा : शहापूर तालुक्यातील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी केली. शिवाय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आमचे आदर्श आहेत. त्याचे स्थान सदैव आपल्या हृदयात आहे, असे ते कृतज्ञतेने म्हणाले. आमदार दरोडा पुढे म्हणाले की, शहापूरच्या जनतेने मला मोठ्या विश्वासाने विधानसभेवर पाठवले आहे. मात्र, शिंदे सरकारच्या काळात मी राष्ट्रवादीचा आमदार असताना माझ्या तालुक्यातील सुमारे ६५ कोटींची विकासकामे शिंदे सरकारने रद्द केली. माझ्या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे, असे आमदार दरोडा म्हणाले.

अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा :ग्रामीण भागात मूलभूत सुविधा विभागांतर्गत सहा कोटींची कामे आमदार म्हणून सुचवली आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत 34 कोटींची कामे रद्द करण्यात आली आहेत. आदिवासी उपयोजना लेखाशिर्ष अंतर्गत 23 कोटींची कामे रद्द करण्यात आली आहेत. तर लेखाशिर्ष अंतर्गत 2 कोटींची कामे रद्द करण्यात आली आहेत. तालुक्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे आमदार दरोडे यांनी सांगितले.

हेही वाचा -Monsoon Session 2023 : विरोधी पक्ष आहे कुठे? अजित पवार आमच्याकडे आल्याने...; सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details