मीरा भाईंदर (ठाणे) - महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक दिवसात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत घट झाली. त्यामुळे पालिकेतील आरोग्य विभाग सुस्त झाल्याचे दिसून आले आहे. आज प्रभाग समिती २ मध्ये मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट झाली असली तरीही दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारू शकत नाही.
पालिका प्रशासनाकडून नियम पायदळी -
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या नियमाचे पालन पालिका प्रशासन करताना दिसत नाही. रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा ढिसाळ कारभार सुरू झाला आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करताना कुठेही दिसली नाही. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाटेच्या भीतीपोटी पालिका प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण अशी टीका होत आहे.