महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Rape : १६ वर्षीय पोटच्या मुलीवर बापासह भावाने केला बलात्कार - १६ वर्षीय पोटच्या मुलींवर बलात्कार ठाणे कल्याण

कल्याण कोळसेवाडी परिसरातील पीडित अल्पवयीन मुलगी कुटूंबासह राहते. तिच्या नराधम बापाचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून पीडितेची आई ६ महिन्यापूर्वी मूळ गावी उत्तरप्रदेशात गेली आहे. तर नराधम भावाची पत्नीही माहेरी गेली आहे. याचाच फायदा घेऊन नराधम बाप लेकानी पीडितेला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देऊन २३ वर्षीय तिच्या नराधम भावाने लैगिंक अत्याचार केला.

कोळसेवाडी पोलीस ठाणे
कोळसेवाडी पोलीस ठाणे

By

Published : Jan 30, 2022, 7:03 PM IST

Updated : Jan 30, 2022, 7:30 PM IST

ठाणे - एका १६ वर्षीय पोटच्या मुलीवरच सख्या बापासह भावाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बाप लेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

माहिती देतांना कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

विवस्त्र करत बेदम मारहाण आणि अत्याचार

कल्याण कोळसेवाडी परिसरातील पीडित अल्पवयीन मुलगी कुटूंबासह राहते. तिच्या नराधम बापाचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय असून पीडितेची आई ६ महिन्यापूर्वी मूळ गावी उत्तरप्रदेशात गेली आहे. तर नराधम भावाची पत्नीही माहेरी गेली आहे. याचाच फायदा घेऊन नराधम बाप लेकानी पीडितेला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देऊन २३ वर्षीय तिच्या नराधम भावाने लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर नराधम बापानेही बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे गेल्या ६ महिन्यापासून तिच्यावर हे नराधम अत्याचार करत होते. दरम्यानच्या कालावधीत पीडित मुलीने त्याच्यावर घडलेल्या प्रसंग आईलाही सांगितले. दोघा नराधमाने तीला विवस्त्र करून घरातच बेदम मारहाण केली.

अशी आली घटना उघडकीस

दोघा नराधमांचे वाढते अत्याचाराने भयभीत होऊन परिसरात राहणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर सामाजिक महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित मुलीने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच पोलिसांनी नराधम बाप लेकावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आज दोघाही नराधमांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे. मात्र बाप आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -Pune Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हातोडीने हल्ला; आरोपीला अटक

Last Updated : Jan 30, 2022, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details