महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुकानात चप्पल दाखवण्याच्या बहाण्याने माळ्यावर नेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग - उल्हासनगर

उल्हासनगर येथील एका चप्पल दुकानात १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. दुकानदाराला मध्यवर्ती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

By

Published : Dec 25, 2019, 9:37 PM IST

ठाणे- उल्हासनगर येथील एक 10 वर्षीय मुलगी चप्पल खरेदी करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी दुकानदाराने तिला चप्पल दाखवण्याच्या बहाण्याने दुकानाच्या वरच्या माळ्यावर नेले. वरच्या माळ्या नेवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


ही घटना उल्हासनगरातील कॅम्प क्र.3 परिसरात रामा शुजमध्ये घडली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. किशन मेघांनी (वय 32 वर्षे)असे आरोपीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कॅम्प क्र. 3 परिसरात रामा शुज नावाचे दुकान आहे. सायंकाळच्या सुमारास 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीला वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी गिफ्ट म्हणून त्या दुकानात चप्पल खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी दुकानदार किशन मेघांनी याने त्या मुलीला चप्पल दाखवण्याचा बहाणा करीत दुकानाच्या वरच्या माळयावर नेले. त्या ठिकाणी त्या मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला.


त्या मुलीने घरी आल्यावर या घटनेबाबत आपल्या आईला सांगताच मुलीच्या आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन किशन याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी किशन याला अटक केली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोकरे करीत आहेत.

हेही वाचा - मेगा ब्लॉकनंतरही डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दी, प्रवाशांचे हाल

ABOUT THE AUTHOR

...view details