महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Father Rape Minor Girl Bhiwandi : पोटच्या १० वर्षीय मुलीची हत्याकरुन बापाने केला मृतदेहावर बलात्कार; नराधमाला अटक - मुलीवर बापाने केला बलात्कार

एका ३६ वर्षीय नराधम बापाने पोटाच्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा ( 10-year-old girl raped Bhiwandi ) प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला विरोध केला असता आरोपी बापाने टॉवेलच्या सहाय्याने तिची गळा आवळून हत्या केली. संतापजनक बाब म्हणजे आरोपी बापाने चिमुकलीच्या मृतदेहावर बलात्कार केला. ही घटना भिवंडी शहरात घडली आहे.

प्रातिनिधीक चित्र
प्रातिनिधीक चित्र

By

Published : Jul 15, 2022, 7:41 PM IST

Updated : Jul 15, 2022, 10:29 PM IST

ठाणे -बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली आहे. एका ३६ वर्षीय नराधम बापाने पोटाच्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा ( 10-year-old girl raped Bhiwandi ) प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला विरोध केला असता आरोपी बापाने टॉवेलच्या सहाय्याने तिची गळा आवळून हत्या केली. संतापजनक बाब म्हणजे आरोपी बापाने चिमुकलीच्या मृतदेहावर बलात्कार केला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक


पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगी नराधम बाप व आईसोबत भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होती. ती सहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. तर तिला १२ वर्षाचा एक भाऊ असून तो मूळ गाव असलेल्या तेलंगणा येथे राहतो. नराधम बापाला दारूचे व्यसन असल्याने कुटुंबाच्या उदारर्निवाह साठी तिची आई एका गोदामात कामाला आहे. नराधमाला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी घरात पत्नी व मुलीशी भांडण करत होता. त्यामुळे मृतक मुलगी त्याला विरोध करत असल्याने दोघांमध्ये सतत भाडणं होत होती. त्यातच काल दुपारच्या सुमारास नराधम बाप दारू नशेत घरी आला. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून मुलीवर बळजबरीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मृत मुलीने त्याला विरोध केल्याने त्याने तिचा घरातील टॉवेलच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.


हत्या करून बलात्कार केल्यानंतर मृतक मुलीला झोपल्या सारखे दाखवून तिच्यावर तोंडावर उशी ठेवली. पत्नीला दोन तीन वेळा फोन करून तू घरी कधी येणार विचारले. पत्नी घरी परतली तेव्हा त्यानेही तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र नराधमाने तिला लगेच जेवण बनवण्यास सांगितले. मात्र पत्नीला संशय आल्याने तिने नराधमाला मुली बद्दल विचारले असता ती झोपली आहे. पावसात खेळत असल्याने खूप थकली आहे. झोपू द्या, असे सांगितल्यावर पत्नीने मुलगी बेडवर झोपलेल्या अवस्थेत पाहिले. जेवण बनवल्यानंतर पत्नीने मुलीजवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. तिने ताबडतोब तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले, तिच्यासोबत नराधम बाप मुलीची काळजीत असल्याचे भासवत तिच्यासोबत रुग्णालयात आला. परंतु डॉक्टरांना हे प्रकरण संशयास्पद असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले असता नराधम बाप रुग्णालयातून पळून गेला.

भिवंडी शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर नराधम बापावर पोक्सोसह अत्याचार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला असता त्याला भिवंडी शहरातूनच तीन तासातच अटक करून बेड्या ठोकल्या आहे. आज नराधम बापाला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आहे. या घटनेचा अधिक तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -Hill line Police Station Thane Crime: वयाचे बनावट कागदपत्रे तयार करुन अल्पवयीन मुलीचा विवाह करणाऱ्या आई व मामावर गुन्हा दाखल

Last Updated : Jul 15, 2022, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details