ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने पाहुणी म्हणून मावशीकडे येऊन राहिलेल्या आठ वर्षीय भाचीवर नराधम काकाने वेळोवेळी अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेने काका-भाचीच्या नात्याला काळीमा फासल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
धक्कादायक ! २६ वर्षीय काकाचा आठ वर्षीय भाचीवर अत्याचार, नराधमाला बेड्या - uncle rapes neice
लॉकडाऊन काळात गणेशत्सोवसाठी मावशीकडे आलेल्या भाचीवर काकाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी काकास अटक करण्यात आली असून त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी आठ वर्षीय भाची शाळा बंद असल्याने गणपती उत्सवावेळी मावशीकडे येऊन राहिली होती. तेव्हा पासून ती तिथेच सुट्टी घालवत होती. मात्र, या दरम्यान २६ वर्षीय नराधम काकाची तिच्यावर वाईट वक्र दृष्टी पडली आणि त्याने तिला दमदाटी करून वेळोवेळी तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या वारंवार होणाऱ्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पीडित भाचीने या घटनेची माहिती मावशीला सांगितली. हे ऐकून मावशीलाही धक्काच बसला.
या घटनेने व्यथीत होऊन तिने अल्पवयीन भाचीला घेऊन थेट गणेशपुरी पोलीस ठाणे गाठले आणि झालेला प्रकार पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिराने अत्याचारी काकाला अटक केली आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलिस ठाण्याचे इंचार्ज महेश सगडे करीत आहेत. तर शनिवारी नराधम काकाला भिवंडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.