महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे; विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप - विद्यार्थीनीचा विनयभंग ठाणे बातमी

प्रमोद नायक (वय ३५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्याध्यापक त्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकारही समोर आला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली. या मुख्याध्यापकाला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

minor-girl-physical-abuse-in-thane
अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे

By

Published : Dec 26, 2019, 9:00 PM IST

ठाणे - एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गात मुख्याध्यापकाने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील शेलार गावातील एका शाळेत घडला आहे.

अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत वर्गातच अश्लील चाळे
घटनेची माहिती पीडितेच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी शाळेच्या आवारात धाव घेऊन त्या विकृत मुख्याध्यापकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. भिवंडी तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून विकृत मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रमोद नायक (वय ३५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुख्याध्यापक त्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकारही समोर आला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली. या मुख्याध्यापकाला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी-वाडा रोडवरील शेलार गावात एक माध्यमिक शाळा आहे. या शाळेत १४ वर्षाची पीडिता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एक तर्फी प्रेम करीत होता. ३ दिवसांपूर्वीच त्याने तीला शाळेच्या मैदानात गाठून कार्यलयात येण्यास सांगितले. मात्र, पीडिता गेली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी वर्गात कोणी नसल्याचे पाहून त्याचा फायदा घेत, आरोपीने तिच्याशी वर्गात अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. या घृणास्पद प्रकाराने भयभीत होऊन पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

आईने नातेवाईकांसह शाळेत धाव घेऊन मुख्याध्यापकाला गाठून घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. मात्र, उलट-सूलट बोलण्याने नातेवाईकांनी संतप्त होऊन त्याला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपी मुख्याध्यापकाला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details