महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे रुळावर दगडी ठेवल्याप्रकरणी अल्पवीयन मुलगा ताब्यात, साथीदारांचा शोध सुरू

रेल्वे रुळावर दगड ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

c
c

By

Published : Aug 28, 2021, 3:52 PM IST

ठाणे -धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता रेल्वे ट्रॅकवरही दगडी ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आला आहे. डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास दगडी ठेवलेल्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती व तांत्रिक तपास करत या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

मोटरमनमुळे टळला अनर्थ

डोंबिवली रेल्वे स्थानकाहून शुक्रवारी सायंकाळच्या 6 वाजण्याच्या सुमारास कर्जत लोकल कल्याणच्या दिशेने निघाली. डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर लोकल पोहोचली असता मोटरमनला स्लो-डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवल्याचे लक्षात आले. मोटरमनने प्रसंगावधान राखत गाडी थांबवून याबाबत रेल्वेला माहिती दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या ट्रॅकवर ठेवलेले एक मोठ्या आकाराचा, सुमारे 15 लहान दगडी बाजूला केल्या. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत दगड कोणी ठेवले याचा तपास पोलीस करत होते.

खोडसाळपणाने कृत्य केल्याची माहिती

खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून खोडसाळपणाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -ठाणे जिल्ह्यात काँग्रेस व्हेंटिलेटरवर असनूही 'एकला चलो रे'चा नारा; मात्र 'या' नेत्याने काढली हवा

ABOUT THE AUTHOR

...view details