ठाणे- सहा वर्षीय सख्या चुलत बहिणीला दिवाळीसाठी फटाके घेऊन देतो, असे सांगितले. त्यानंतर तिला झाडा-झुडूपात नेवून तिच्यावर १३ वर्षीय सख्या चुलत भावानेच अमानूष अत्याचार केले. नंतर आपले बिंग फुटू नये म्हणू नाक तोंड दाबून तिचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात एकच संतापाची लाट पसरली आहे.
धक्कादायक : 13 वर्षीय सख्या चुलत भावानेच 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून केला खून - चिमुरडीवर अत्याचार
13 वर्षीय मुलाने 6 वर्षीय सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार करून खून केल्याची घटना भिवंडी शहराजवळ कोनगांव येथे घडली.

ही घटना भिवंडी शहरालगतच्या कोनगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली पाडा ,पाईपलाईन येथील निर्जस्थळी काल (मंगळवार) सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी कोनगांव पोलिसांनी सुरवातीला अज्ञात आरोपीच्या विरोधात भा.दं.वि. 363, 302, 201, 364, 366 (अ), 376 सह लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,9 (ह) 10 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपास सुरु केला असता २४ तासाच्या आत भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार भाऊबीजेच्या दिवशी उघडकीस आला.
या धक्कादायक घटनेचा कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. या घटनेतील आरोपी 13 वर्षीय सख्खा चुलत भाऊ असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा विधिसंघर्ष आरोपी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून या अल्पवयीन विधिसंघर्ष आरोपीस ताब्यात घेऊन आज (बुधवार) बाल न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी भिवंडी येथील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.