महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Uday samant : महाराष्ट्रातून उद्योग का गेले? राज्य सरकार काढणार श्वेतपत्रिका - मंत्री उदय सामंत, नार्वेकर आले तर स्वागतच - Industries Minister Uday Samant

राज्यातील उद्योग कोणामुळे गेले ? का गेले ? जे जे प्रकल्प जात आहेत याबाबत राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार असल्याचे विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आधी वेदांता, एअर बस, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रॅग प्रोजेक्ट हे महत्वाचे प्रकल्प राज्यबाहेर का गेले? कोणामुळे गेले? याचे कारण महाराष्ट्रातील जनतेला समजणे ( why the project moved from Maharashtra to Gujarat ) गरजेचे आहे. विद्यमान सरकर सत्तेत आल्यापासून तीन महिन्यात एकही प्रकल्प गेलेला नाही. जे प्रकल्प गेले आहेत ते आधीच्या सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार लवकरच श्वेतपत्रिका काढण्याच्या तयारीत असून दूध का दूध पाणी का पाणी होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी सांगितले. ठाण्यात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.

Minister Uday samant
राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

By

Published : Oct 29, 2022, 11:09 PM IST

ठाणे :राज्यातील उद्योग कोणामुळे गेले ? का गेले ? जे जे प्रकल्प जात आहेत याबाबत राज्य सरकार श्वेतपत्रिका काढणार असल्याचे विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आधी वेदांता, एअर बस, मेडिकल डिवाइस, बल्क ड्रॅग प्रोजेक्ट हे महत्वाचे प्रकल्प राज्यबाहेर का गेले? कोणामुळे गेले? याचे कारण महाराष्ट्रातील जनतेला समजणे ( why the project moved from Maharashtra to Gujarat ) गरजेचे आहे. विद्यमान सरकर सत्तेत आल्यापासून तीन महिन्यात एकही प्रकल्प गेलेला नाही. जे प्रकल्प गेले आहेत ते आधीच्या सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार लवकरच श्वेतपत्रिका काढण्याच्या तयारीत असून दूध का दूध पाणी का पाणी होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी सांगितले. ठाण्यात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.


विरोधकांना सत्ता गेल्याचा राग - विरोधकांना सत्ता गेल्याचा राग आला आहे. मात्र,आमचे सरकार आल्यानंतर मागील तीन महिन्यात एकही प्रकल्प परत गेलेला नाही. असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.महाराष्ट्रातुन प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना उदयोगमंत्री सामंत यांनी शनिवारी ठाण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत तारीखनिहाय कागदपत्रे दाखवत चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान उद्योग राज्यात टिकावे यासाठी मागील सरकारच्या काळात हाय पावर किंवा केबिनेटच्या सब कमिठीची एकही बैठक झाली नसून राजकारण केले जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला.

महाराष्ट्रातून उद्योग का गेले? राज्य सरकार काढणार श्वेतपत्रिका - मंत्री उदय सामंत




१० प्रकल्प महाराष्ट्रात - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विकास कामाचा धडाका लावला आहे. हे विरोधकांना पटत नाही. मुख्यमंत्रांनी उद्याग महाराष्ट्रात टिकून रहावे यासाठी एक बैठक सुद्धा घेतली होती. दरम्यान १० नवीन प्रकल्प राज्यात येत असून, या संदर्भात लवकरच घोषणा केली जाईल. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात राज्यात अजून मोठे प्रकल्प आणून दाखवू, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे.


उद्योग जर आणायचे आहे तर राजकारण नको - राज्यात येणाऱ्या काळात अनेक उद्योग येतील, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना खुशाल करु द्या. आम्ही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली कामाने उत्तर देऊ, असे यावेळी सामंत यांनी सांगितले. येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पांची किमंत किती आहे. २५ हजार ३६८ कोटी रुपयाचे नवीन प्रकल्प येत आहेत. आम्ही तीन महिन्यात काहीच केलं नाही असे जे बोलत आहेत ते सर्व खोटे असून विरोधकांनी राजकारण करू नये, असे यावेळी सामंत यांनी सांगितले.



मिलिंद नार्वेकर माझे चांगले मित्र -आम्ही सदैव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच आहोत. एक व्यक्ती म्हणून राजकारणा पलीकडे त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो त्यांनीच माझी भेट उद्धव ठाकरे यांच्याशी करून दिली होती इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यातही मिलिंद नार्वेकर यांचा मोठा वाटा आहे .त्यांचे शिंदे गटा सोबतच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षासोबत चांगले संबंध आहेत म्हणूनच क्रिकेट बोर्ड च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते त्यांना मिळाले. अशा व्यक्तीच्या जीवावर जर कोणी उठलं असेल किंवा कोणी वाईटावर ठेवून असेल तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहून जरी त्यांच्यासोबत नसले तरीसुद्धा आम्ही त्यांना हवी ते सर्व मदत करायला तयार आहोत राहिला प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत त्यांची जवळीक असल्याची चर्चा आहे तसं असेल आणि ते जर शिंदे गटांमध्ये येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करु असे उदय सामंत यांनी ठाण्यात सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details