महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची 'अग्निपथ'वरुन केंद्र सरकारवर टीका, म्हणाले, 'देशालाही कंत्राटीवर...' - अग्निपथ योजनेवरुन जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारवर टीका

अग्निपथ योजनेच्या ( Agneepath Scheme ) माध्यमातून भारतीय सैन्याला कंत्राटीवर देण्याचं काम केले जाते आहे. हे योग्य नसून देशालाही कंत्राटीवर दिले जात असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर केली ( Jitendra Awhad Criticized Modi Government ) आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

By

Published : Jun 18, 2022, 9:22 PM IST

ठाणे -केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलात 'अग्निपथ योजना' ( Agneepath Scheme ) जाहीर केली. यानंतर देश भरात योजनेच्या विरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. त्यातच आता राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही अग्निपथ योजनेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय सैन्याला कंत्राटीवर देण्याचं काम केले जाते आहे. हे योग्य नसून देशालाही कंत्राटीवर दिले जात असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. ते भिवंडीतील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना केंद्र सरकारवर 'अग्निपथ'वरून हल्लाबोल ( Jitendra Awhad Criticized Modi Government ) केला.

जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ज्या वयात तरुणांना शिक्षणाची गरज असते, त्या वयात तरुणांच्या हातात शस्त्र देणारी ही योजना असून त्यामुळे देशाला धोका वाढणार आहेत. केंद्र सरकारकडून एक अशी पर्यायी व्यवस्था तयार केली जात आहे. ज्यांचा वापर तुम्हाला तुमच्या विरोधकांना करता येईल. तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, त्याच्या वरती उपाय योजना करता आली असती. पण, बेरोजगारांचा आम्ही नोकरी देतोयस, असे सांगून त्याना सैन्यात ढकलायचं आणि एक अशी आर्मी तयार करायची जी एका वेगळ्या विचाराने समोर येईल. त्यामुळे सैन्यात कोण असले पाहिजे आणि देशाच्या सुरक्षेसाठी काय केले. यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Vidya Chavan : 'मोठ्या नेत्यांशी जवळीक साधून...'; राष्ट्रवादीची चित्रा वाघांवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details