ठाणे -बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात कन्हैय्या कुमारने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात जवळपास २०-२५ मिनिटे आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांच्यात गुप्त बैठक चालली.
या बैठकीत बिहार निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे कळत असून बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. एरवी प्रसार माध्यमांशी स्वत:हून बोलणारे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि कन्हैय्या कुमार यांनी भेटीनंतर प्रसार माध्यमांशी मात्र बोलणे टाळले.