ठाणे - शिवसेना नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने पोलिसांच्या घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत असतानाच एकनाथ शिंदे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या बागेत बदक, ससा यासारख्या प्राणी आणि पक्षांनादेखील खाऊ घालून माणुसकीचे दर्शन घडवून दिले.
एकनाथ शिंदेंकडून पोलिसांना मदत, मुक्या प्राण्यांसाठीही पुरवले अन्न
सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात असल्याने पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. काही पशु-पक्षी मानवाच्या अधिक सहवासात येऊन अन्नासाठी त्यांच्यावर अंवलंबून राहू लागल्याने त्यांचे हाल होत आहेत. यासाठी शिंदे यांनी पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत पशु-पक्षांनाही अन्न पुरवण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे