ठाणे - कोणत्याही परिस्थितीत शहापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. तसेच आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन अधिकाऱ्यांनी कोरोनाशी लढावे, अन्यथा कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापुरातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.
'अधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी लढावे' - eknath shinde meeting
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा आज शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
!['अधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोरोनाशी लढावे' minister eknath shinde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7317059-thumbnail-3x2-eknath.jpg)
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा आज शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. शहापूर तालुक्यात आजपर्यंत ६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ११ रुग्ण बरे झाले आहेत, तर एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत शहापूर तालुक्याचा कोरोनाचा आकडा कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले असून यापुढे शहापूर तालुक्यातून अत्यावश्यक सेवेत जाणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची राहण्याची सोय गावाबाहेर करण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील, असेही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्री शिंदे यांनी शहापूर पंचायत समितीच्या शेतकी हॉलमध्ये बैठक घेतली. यात त्यांनी कोव्हिड १९ बाबत चालू असलेले फिवर क्लिनिक, विलगीकरण कक्ष, तसेच उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, येथील सोयी सुविधा याबाबत माहिती घेतली. तसेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू याबाबत चर्चा केली. याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, खासदार कपिल पाटील, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा तसेच अधिकारीवर्ग उपस्थित होता.