ठाणे : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर ( Minister Deepak Kesarkar ) हे आज १९ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास उपस्थिती होते.
Minister Deepak Kesarkar : भाषणात व्यत्यय, मंत्री दीपक केसरकरांनी आयपीएस अधिकाऱ्याला व्यासपीठावरच सुनावले - दिपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे ( Minister Deepak Kesarkar ) भाषण सुरु असतानाच व्यासपीठावर आयपीएस अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी जोरजोरात चर्चा करीत होते. त्यामुळे मंत्री केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना आपले भाषण थांबवत कडक शब्दात सुनावले.
व्यासपीठावरच अधिकाऱ्याला सुनावले - शालेय शिक्षण मंत्री केसरकरांचे भाषण सुरु असतानाच व्यासपीठावर आयपीएस अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी जोरजोरात चर्चा करीत होते. त्यामुळे मंत्री केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना आपले भाषण थांबवत कडक शब्दात सुनावले.
मंत्री केसरकर काय म्हणाले - जब मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारीने डिसीप्लेन समजना चाहिये, हमे पता है, कि तुम्हे लॅंगवेज का प्रॉब्लम है. मै आखरी बार वार्निंग दे रहा हू, असे बोलून किमान मंत्र्यांचे भाषण सुरु असताना तरी बडबड करू नका ? असे सांगत सर्वासमोरच व्यासपीठावर हेड सीएचआर आणि ससस्टेन निबिलिटी एलटीआर असलेले आयपीएस अधिकारी प्रत्युष पांडा यांना सुनावले.