ठाणे - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दमण निर्मित मद्याचा साठा जप्त केला असून, एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू व्हायला थोडाच काळ बाकी असताना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केलीआहे.
लाखोंचा मद्य साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई - आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा
जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दमण निर्मित मद्याचा साठा जप्त केला असून, एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, कोकण विभाग उपायुक्त सुनील चव्हाण, अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालिका उषा वर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या पुलावर सापळा रचून एक संशयित मोटार अडविण्यात आली. गाडीची झडती घेतली असता त्यात दमण निर्मित दारूच्या बाटल्या आढळून आल्या. वाहनचालकाकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या घरी लपवून ठेवलेला दारूचा साठा अधिकाऱ्यांच्या हाती सोपवला. इंपिरियल ब्लु, मॅकडोवल नं 1, रॉयल स्टॅग अशा विविध ब्रॅण्डच्या दारीच्या बाटल्या मिळाल्या आहेत. त्यावर बनावट लेबल लावून महाराष्ट्रात त्याची विक्री करण्याचा डाव होता. मद्याचे एकूण 41 बॉक्स व टाटा कंपनीची गाडी असा एकूण रुपये 12 लाख 84 हजार 124 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गाडीच्या ड्राइव्हरला देखील पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे कुठपर्यंत गेली आहेत याचा शोध सध्या उत्पादन शुल्क विभागा करत आहे.