महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विष प्रयोग केल्यामुळे दुभत्या जनावरांचा तडफडून मृत्यू; अज्ञाताविरोधात गुन्हा - दुभत्या जनावरांचा तडफडून मृत्यू

अंबरनाथ तालुक्यातील इनगावात शेतकरी वसंत कडव कुटूंबासह राहतात. ते अनेक वर्षांपासून शेतीच्या व्यवसायासह जोड धंदा म्हणून त्यांनी 20 जनावरे पाळली आहेत. कडव यांची 19 जनावरे चारण्यासाठी त्यांचा गुराखी गावानजिक असलेल्या माळ रानात घेऊन गेला होता. मात्र, ही सर्व जनावरे गुराख्याचे लक्ष नसताना अचानक बेपत्ता झाली. कडव यांनी गुराख्यासोबत रात्रभर माळ रानात बेपत्ता जनावरांचा शोध घेतला. मात्र, त्यांना कुठेही जनावरे आढळून आली नाहीत.

thane
विष प्रयोग केल्यामुळे दुभत्या जनावरांचा तडफडून मृत्यू; अज्ञातविरोधात गुन्हा

By

Published : Jan 18, 2020, 6:39 PM IST

ठाणे - दुधाचा व्यवसाय करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या 8 दुभत्या जनावरांना विष पाजून मारल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील वांगणी जवळील पाषाण गावात घडली आहे. या जनावरांमध्ये 7 म्हशी आणि एका गाईचा समावेश आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकरी वसंत कडव यांच्यावर दुभती जनावरे गेल्याने आर्थिक संकट कोसळले आहे.

विष प्रयोग केल्यामुळे दुभत्या जनावरांचा तडफडून मृत्यू; अज्ञातविरोधात गुन्हा

हेही वाचा -प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; गुंगीचे औषध देऊन चिरला गळा

अंबरनाथ तालुक्यातील इनगावात शेतकरी वसंत कडव कुटूंबासह राहतात. ते अनेक वर्षांपासून शेतीच्या व्यवसायासह जोड धंदा म्हणून त्यांनी 20 जनावरे पाळली आहेत. कडव यांची 19 जनावरे चारण्यासाठी त्यांचा गुराखी गावानजिक असलेल्या माळ रानात घेऊन गेला होता. मात्र, ही सर्व जनावरे गुराख्याचे लक्ष नसताना अचानक बेपत्ता झाली. कडव यांनी गुराख्यासोबत रात्रभर माळ रानात बेपत्ता जनावरांचा शोध घेतला. मात्र, त्यांना कुठेही जनावरे आढळून आली नाहीत.

हेही वाचा -रांगोळी पुसल्याच्या संशयातून 'सख्खे शेजारी झाले पक्के वैरी'; घटना सीसीटीव्हीत कैद

कडव यांनी सकाळी पुन्हा जनावरांचा शोध घेण्यास सुरवात केली. तेव्हा उल्हासनदीच्या काठावरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. नदीच्या काठावर त्यांच्या 6 म्हशी मृत अवस्थेत आढळून आल्या. यातील काही म्हशींनी कडव यांच्या सोमारच तडफडून जीव सोडला. यामध्ये 4 गाभण म्हशी होत्या तर एक गाय आणि एक म्हैस अजूनही बेपत्ता आहे.

हेही वाचा -नवी मुंबईत 2019 मध्ये महिला अत्याचारात वाढ; १६९ बलात्काराचे गुन्हे दाखल

दुधाचा व्यवसाय करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या कडव यांच्यावर दुभती जनावरे गेल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ज्या कोणी या मुक्या जीवांना मारण्याचा अमानुष प्रकार केला त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांसह घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details