महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कळवा टोलनाक्यावर गावी जाण्यासाठी परप्रांतीयांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - कळवा टोलनाका परप्रांतियांची गर्दी

सरकार आपल्यापरीने सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, हे मजूर अशा पद्धतीने गर्दी करून सरकारने योजलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत आहेत.

kalwa toll plaza
कळवा टोलनाक्यावर गावी जाण्यासाठी परप्रांतीयांची गर्दी

By

Published : May 21, 2020, 11:27 AM IST

Updated : May 21, 2020, 12:21 PM IST

ठाणे - कोरोनाच्या भीतीने गावी जाणाऱ्या परप्रांतीयांच्या संख्येत काही केल्या घट होताना दिसत नाही. आज(गुरुवार) कळवा टोलनाक्याजवळ परप्रांतीय मजुरांनी एकच झुंबड केली होती. सरकार आपल्यापरीने सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असतानाच हे मजूर मात्र अशा तऱ्हेने गर्दी करून सरकारने योजलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत आहेत.

कळवा टोलनाक्यावर गावी जाण्यासाठी परप्रांतीयांची गर्दी

आज(गुरुवारी) पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर आपले सामान घेऊन बसलेले दिसून आले. घरापासून दूर असलेल्या या परप्रांतीयांना जवळपास जेवणाची कोणतीच सोय नसल्याने उत्तर भारतीय संस्कार मंडळाच्यावतीने त्यांना जेवणाचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे अनेक ठिकाणी गर्दी करणाऱ्या 700 ते 800 परप्रांतीय मजुरांना आपल्या संस्थेतर्फे मोफत जेवणाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली.

Last Updated : May 21, 2020, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details