महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण पश्चिम विधानसभा जागेसाठी शिवसेनेची खेळी की सेनेला धक्का?

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील चारही विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या उमेद्वारांच्या भाजपने गुरूवारी मुलाखती घेतल्या.

कल्याण पश्चिम विधानसबा जागेसाठी शिवसेनेची खेळी की सेनेला धक्का

By

Published : Aug 30, 2019, 12:40 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील चारही विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या उमेद्वारांच्या भाजपने गुरूवारी मुलाखती घेतल्या. भाजपने विधानसभेची तयारी जोरात करत असल्याचे दिसत आहे. विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी असलेले साईनाथ तरे यांनी भाजपकडून कल्याण पश्चिम विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखात दिल्याने एकीकडे शिवसेनेची राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे हा शिवसेनेलाच धक्का मानला जात आहे.

कल्याण पश्चिम विधानसबा जागेसाठी शिवसेनेची खेळी की सेनेला धक्का

हेही वाचा - अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेश ठरला; 1 सप्टेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपात

कल्याण-डोंबिवलीमध्ये येणाऱ्या चारही विधानसभेसाठी गुरूवारी भाजपच्यावतीने भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि निरीक्षक मकरंद देशपांडे डोंबिवलीत आले होते. यावेळी इच्छुकांमध्ये कल्याण पश्चिम चे विद्यमान आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मुलाखाती दिल्या आहेत.

कल्याण पश्चिम विधानसभा सध्या भाजपच्या कब्जात असून देखील या जागेवर शिवसेनेने लोकसभा निवडणुकीदरम्यान दावा केल्याने त्यावेळेपासूनच भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीबाबत नाना चर्चा रंगल्या आहेत. त्यातच डोंबिवली भाजप कार्यालयामध्ये महापालिका हद्दीतील चारही विधानसभेसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्याने भाजपा नेतृत्वासमोर आव्हान उभे ठाकले आहे. यातच मुलाखतीसाठी शिवसेना नगरसेविका मनीषा तरे यांचे पती व शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी कल्याण पश्चिम विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मुलाखतीला हजेरी लावत तिकीट आपल्यालाच मिळणार असा त्यांनी दावा केला आहे. मात्र, हा घोळ येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

हेही वाचा - पिकविम्याचं, कर्जमाफीचं बोला; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणाऱ्यांना पोलिसांनी उचलले

एकीकडे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आमचा बालेकिल्ला असल्याचे सांगत या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदार असल्याने भाजपकडून ही जागा सोडण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे या जागेबाबत तिढा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, युतीबाबत 'आमचं ठरलंय' असा सेना भाजपकडून सांगण्यात येत असले तरी जागा वाटपाबाबत काहीच निर्णय न झाल्याने शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details