नवी मुंबई - नवी मुंबईतील फोर्टिज या खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्री डॉक्टरांनी रुग्णास दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचाराअभावी नवी मुंबईतील व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे.
उपचारास नकार दिल्याने व्यापाऱ्याचा मृत्यू, नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड - new mumbai corona positive patients
रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी रुग्णाची अवस्था बिकट असूनही साधे तपासलेही नाही. यामुळे सुरेश चव्हाण यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
नवी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल 18 हजारांच्या पुढे गेला असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रशासनाने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, उपलब्ध बेडची क्षमता आणि रुग्णांची वाढती संख्या यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. याचा परिणाम शासकीय रुग्णालयासोबत खाजगी हॉस्पिटलमध्येही जाणवू लागला आहे. यामुळे नवी मुंबईतील व्यापारी सुरेश चव्हाण यांना उपचारांअभावी जीव गमवावा लागला.