ठाणे -ठाणे हा अंमली पदार्थ तस्करांचा अड्डा झाला आहे. अनेक तस्करांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. १८ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तीन आरोपींना ९० ग्राम एम. डी. पावडर या अमली पदार्थासह अटक केली. बनोबर शफिक खोटाळ (३१) रा. मस्जिद बंदर, मुंबई, आदिल नाजीरभाई शेख (२४) रा. जुनागड, गुजरात आणि असामा मोहम्मद हुसेन भाभा (१९), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
२२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी -
हनीकोम्ब बारच्या समोरील सर्व्हिस रोडवर दोन पुरुष आणि एक महिला अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचून तिघांची झडती घेतली. यावेळी विक्रीसाठी आणलेला तब्बल ४ लाख ५० हजार किंमतीचा ९० ग्राम एमडी हा अंमलीपदार्थ त्यांच्याकडे आढळून आला. त्यानंतर पोलिसांना त्यांना अटक केली. त्यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची बाजी तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर