ठाणे - काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर 48 वर्षीय काकाने बलात्कार केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अपंग आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 376 सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली
भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तर त्याच गावात नराधम काका ही राहतो. काही दिवसापूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे रविवारी चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पीडितेवर घडलेला प्रसंग सांगताच, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात येऊन नराधम काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
आरोपीला न्यायालयात हजर करणार
दाखल गुन्ह्यावरून आरोपी काकाचा ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी शोध सुरू केला असता, त्याला भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधिकऱ्याने दिली आहे. ज्याची अधिक चौकशी पोलीस करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
नात्याला काळिमा : 16 वर्षीय पुतणीवर बलात्कार करणारा नराधम काका गजाआड - भिवंडी
भिवंडीमध्ये काकाने 16 वर्षीय पुतणीवर बलात्कार केला. या प्रकरणी भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा पोलिसांनी आरोपीला काकाला पकडले आहे.
नात्याला काळिमा : १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार करणारा नराधम काका गजाआड