मीरा भाईंदर (ठाणे) - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. ( Indian Citizens in Ukrain ) यात अनेक विद्यार्थी आहेत. याच विद्यार्थींमध्ये मीरा भाईंदर शहरातील दोन विद्यार्थी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ( Meera Bhayandar Student Stuck in Ukrain ) भाईंदर मध्ये राहणारा साई रापोला हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन या देशात २०१८ पासून स्थायिक झाला. पुढील चार महिन्यात एमबीबीएस शिक्षण देखील त्यांचे पूर्ण होणार आहे. मात्र, या सुरू असलेल्या युद्धात तो अडकून पडला आहे.
यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याच्या परिवाराशी ईटीव्ही भारत प्रतिनिधीने केलेली बातचीत तीन दिवस पुरतील इतकेच साहित्य -
युक्रेन मधील खारकीव या शहरात तो सध्या आहे. खारकीव हे युक्रेन पासून लांब आहे तर रशियाच्या सीमेपासून पासून ५० किलोमीटर जवळ आहे. त्यामुळे साईचे इतक्यात येणे अवघड आहे. सध्या साई सोबत ११ विद्यार्थी गुफेत लपून बसले आहेत. ज्या ठिकाणी तो अडकला आहे त्याठिकाणी पाणी व जेवणाची व्यवस्था नाही. खाण्याचे पदार्थ तीन दिवस पुरतील इतकेच साहित्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे साईंच्या कुटुंबानी सरकारकडे मागणी केली आहे की,तात्काळ दखल घेऊन साई सोबत अडकलेल्या ११ जनाची देखील सुटका करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा -Russia Ukraine Crisis : 'युद्ध सुरुयं, मला शस्त्र द्या, पळ काढण्यासाठी विमान नाही'; युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली
साईनेही भारत सरकारला आवाहन केले आहे की, युक्रेनच्या खारकीव शहरात सध्या आहोत. ज्या ठिकाणी ते आहेत, तिथे जीव धोक्यात आहे. त्याचे कुटुंबीय खूप त्रासात आहेत. मला आई बाबांची आठवण येत आहे. त्याला तसेच त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणले जावे, अशी विनंती त्याने केली आहे. साईचा भाऊ म्हणाला की, सध्या माझा भाऊ साई ज्या परिस्थितीत आहे ती फार कठीण आहे. पुढील दोन दिवस पुरेल इतके जेवणाचे पदार्थ त्यांच्याकडे आहे. साई रापोल सोबत ११ विध्यार्थी आहेत. अंडरग्राऊंड लपून बसले आहेत. भारत सरकारने माझ्या भावाला लवकर भारतात आणावे, ही विनंती आहे.