महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्याच्या महापौरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर - ठाणे महानगरपालिका महापौर

पाणी साचू नये यासाठी सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब निदर्शनास येताच महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेधर धरले. संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.

महापौर पाहणी
महापौर पाहणी

By

Published : Jun 9, 2021, 7:00 PM IST

ठाणे -बुधवारी (आज) सकाळपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले होते. पाणी साचू नये यासाठी सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब निदर्शनास येताच महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेधर धरले. संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.

ठाणे महापौर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रात संभाव्य आपत्कालीन परिस्थ‍िती उद्भवणाऱ्या ठिकाणांची पाहणी महापौर नरेश म्हस्के यांनी भर पावसात केली. यावेळी ठाणे शहरातील चिखलवाडी, भांजेवाडी, गडकरी रंगायतन परिसर, आंबेडकर रोड, सिडको परिसर (रेल्वे पुलाखाली) विटावा रेल्वे ब्रीजखालील जागा भागाची पाहणी महापौरांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details