ठाणे- गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीवरून ठाणे तालुक्यात 731 मिमी (मिलीमीटर), भिवंडी तालुक्यात 694 मिमी, कल्याण तालुक्यात 587 मिमी, उल्हासनगर तालुक्यात 503 मिमी, अंबरनाथ तालुक्यात 456 मिमी, शहापूर तालुक्यात 447 मिमी आणि मुरबाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 230 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
दमदार पाऊस ! ठाणे तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद, तर सर्वात कमी मुरबाडमध्ये - ठाणे
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बरसत असलेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद ठाणे तालुक्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली आहे.
गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात 880.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 दिवसात पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे. तर 30 जून रोजी पडलेल्या पावसाची नोंद ठाण्यात 148 मिमी, कल्याणमध्ये 127 मिमी, मुरबाडमध्ये 84 मिमी, उल्हासनगरमध्ये 117 मिमी, अंबरनाथ 109.20 मिमी, भिवंडीमध्ये 215 मिमी, तर शहापूरमध्ये 80 मिमी इतका पाऊस झाल्याने जिल्ह्यात 24 तासात 880.20 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून आज सकाळपासून मात्र पावसाने उसंत घेतली आहे.