ठाणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वजण आपापल्या घरीच थांबून आहेत. पण, मुंब्र्यात काही जण बाहेर फिरतानाचे चित्र व्हायरल होत होते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. त्यानतंर मुंब्र्यातील मौलाना तौकिल अहमद शम्सी यांनी समस्त मुस्लीम धर्मियांना घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. तसे मशीद बंद करुन तशा सुचनाचे फलकही मशीदीबाहेर लावले आहे.
घरातच राहून सहकार्य करा, मौलानांचे मुंब्रावासीयांना आवाहन - masjid news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना घरात रहा, सामाजिक अंतर ठेवा, अशा सुचना शासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, मुंब्र्यात काहीजण जमातमध्ये म्हणजेच एकत्र येऊन नमाज अदा करत होते. त्यांना घरातच राहून सामाजिक अंतर ठेवत नमाज अदा करण्याचे आवाहन मौलाना तौकिल अहमद शम्सी यांनी केले. तसेच मशिद बंद करुन घराबाहेर निघू नका, मशिदीत नमाज होणार नाही, अशा सुचनाचे फलक मशिदीबाहेर लावले आहे.
मौलाना तौकिल अहमद शम्सी
टाळंबंदीनंतर सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. पण, काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पडणे सुरूच होते. आता इतर मशिदीप्रमाणे सगळ्याच मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. शुक्रवारची नमाज देखील घरीच पडण्याचे आवाहन मौलाना शम्सी यांनी केले होते. त्यामुळे शुक्रवारीही मशिद बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी नागरिकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असल्याने नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन मौलानांनी केले.
Last Updated : Apr 5, 2020, 2:26 PM IST